World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Sep17
लेखांक ७. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीë
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ७.
नम: समस्त भूतानाम् आदिभूताय भूभृते
अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभविष्णवे -२.
सर्वासामान्यपणे पाच महाभूतांमध्ये वर्गीकृत अशा चराचर मूळ पदार्थांचेही मूळ असलेल्या आणि अनेक रूपातील अशा जगत्स्वामी विष्णूला माझे पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार असोत.
वैशंपायन उवाच
श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानि च सर्वश:
युधिष्ठिर: शांतनवं पुनरेवाभ्यभाषत -३.
वैशंपायन ऋषी जनमेजय राजाला म्हणतात, “भीष्माचार्याकडून, संपूर्ण पवित्र धर्म आणि धर्माचार यांच्यासंबंधीचे विवेचन ऐकून धर्मराज युधिष्ठिर भीष्माचार्याना सहा प्रश्न विचारतात”.
किमेकं दैवतं लोके किंवाप्येकं परायणम्
स्तुवन्त: कं कंमर्चन्त: प्राप्नुयुर्वानवा: शुभम् – ४.
को धर्म: सर्व धर्माणां भवता: परमो मत:
किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबंधनात् -५.
प्रश्न १. किमेकं दैवतं लोके म्हणजे ह्या विश्वामध्ये एकमेवाद्वितीय असा देव कोणता आहे? देव ह्याचा आशय स्वतंत्र आणि विश्वनियंत्रक अशी शक्ती. आपण सर्व व्यक्तीश: मर्यादित आणि परतंत्र असलो तरी अशा शक्तीची सुप्त आणि अनामिक ओढ असल्यामुळे आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होतो.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (4727)  |  User Rating
Rate It


Browse Archive