World's first medical networking and resource portal

Dr. Shriniwas Kashalikar's Profile
Special Message:
Over 170 videos, 45 books and 500 articles in Englsh, Hindi and Marathi are available for free download on www.youtube.com/superliving08 and
www.freestress.webs.com
www.slideshare.net/drsuperliving
VOTES0000070
PAGE HITS0060664

लेखांक १३. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातì
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक १३.

अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम्
लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदु:खातिगो भवेत् -८.
भीष्माचार्य पुढे म्हणाले, उत्पन्न होणे, वाढणे, टिकून राहणे, बुद्धिभ्रंश होणे, क्षीणता येणे आणि नाश पावणे असे सहाही विकार नसलेला म्हणून अनादिनिधनं असा, चराचराचा आणि जाणीवेच्या सर्व पातळ्यांचा स्वामी असल्यामुळे लोकाध्यक्षं असा, सर्वान्तर्बाह्य विश्व आणि जाणीवा व्यापणारा म्हणून विष्णू ह्या नावाने ओळखला जाणारा आणि सर्व सत्ताधीश असल्याने सर्वलोकमहेश्वम् असा ईश्वर; निरंतर स्तुती करण्यास म्हणजे उपासना करण्यास सर्वतोपरी योग्य आहे. ह्या सच्चिदानंदाच्या अशा सहवासामुळे, देहबुद्धीजन्य (उत्पन्न होणे, वाढणे, टिकून राहणे, बुद्धिभ्रंश होणे, क्षीणता येणे आणि नाश पावणे) अशा सर्व दु:खांपासून जीवाला मुक्ती मिळते.

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 4916 )  |  User Rating
Rate It

लेखांक १२. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातì
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक १२.
भीष्म उवाच
जगत्प्रभुं देवदेवन्तम पुरुषोत्तमम्
स्तुवन्नामसहस्रेण पुरुषसततोत्थित: -६.
भीष्माचार्य म्हणाले, सर्व जगाचा (चराचर विश्वाचा) स्वामी, देवांचा देव (आपण देव म्हणून किंवा सर्वश्रेष्ठ म्हणून जी कल्पना करू शकतो त्या भ्रामक कल्पनेपलिकडे असलेला) आणि अनंत म्हणजे आपल्या जाणीवेतील सर्व मर्यादित आणि नश्वर विश्वाच्या अतीत असा पुरुषोत्तम आहे. अर्थपूर्ण अशा त्याच्या एक हजार नामांच्या आधारे त्याचे स्मरण (जप) आणि स्तुती करून आपण उद्धरले जातो. (आपल्या जडत्वातून आणि अज्ञानातून मुक्त आणि जागृत होत जातो).
तमेव चार्च्ययन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम्
ध्यायन्स्तुवन्नमस्यंश्च यजमानस्तमेवच ७.
भीष्माचार्य मग म्हणाले, आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या ह्या अविनाशी सत्याला सगुण रूप देऊन त्या पुरुषाची भक्तिपूर्वक पूजा अर्चा करावी. त्याचे ध्यान करावे आणि त्याची स्तुती करावी. त्याला नमन करावे.
ह्याचा मथितार्थ असा की, ह्या अविनाशी तत्वाबद्दल आपल्याला असलेली सुप्त ओढ, तिच्या विरुद्ध असणाऱ्या आपल्या वासनांमुळे दुबळी होते हे जाणून त्या सर्व वासना आणि आशा आकांक्षा; जाणीवपूर्वक आणि सतत त्या पुरुषाच्याकडे वळवायच्या. अशा तऱ्हेने; सर्वान्तर्यामी नियंत्रक प्रभुत्वाने वसणाऱ्या ह्या सत्ताधीशाचा ध्यास घ्यायचा, सर्व लक्ष त्याच्यावरच केंद्रित करायचे, त्याच्याबद्दलची आपली नितांत पण सुप्त आवड मनात घोळवून ती आवड व्यक्त आणि दृढ करणारी स्तुती करायची; आणि त्याच्यापासून दूर नेणारे आपले सर्व संकुचित अस्तित्व त्याच्या चरणावर संपूर्णपणे झोकून द्यायचे, त्याच्या पायावर लोळण घ्यायची!

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 4840 )  |  User Rating
Rate It

लेखांक ११. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रात
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ११.
प्रश्न ५.
को धर्म: सर्व धर्माणां भवत: परमो मत:
धर्म ह्याचा अर्थ सर्व दृश्य आणि अदृश्य अशा विश्वाला आधारभूत अशी व्यवस्था. तिचे अचूक ज्ञान आत्मसात होणे हे मनुष्य जीवनाला आधारभूत असून अशा ज्ञानाला अखिल मानव जातीचा आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचा सर्वश्रेष्ठ धर्म असे म्हणतात.
ह्या धर्माविषयी संभ्रम होऊ नये म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने महाराज युधिष्ठीर हा प्रश्न विचारतात. याअगोदर जे चार प्रश्न विचारले गेले आहेत, त्याना अनुरोधून पाहिले तर, अंतरीचा निर्गुण देव, म्हणजेच योग्य स्तुती आणि पूजेचे अचूक स्थान ह्या सर्वश्रेष्ठ धर्माच्या आचरणानेच प्राप्त हितात आणि आपले जीवन सर्वतोपरी कृतार्थ होत होत; सच्चिदानंद अनुभूतीमध्ये परिणत होते.
प्रश्न ६.
किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसार बंधनात?
याअगोदर विचारात घेतलेल्या धर्माचे एक उन्नत, अत्यावश्यक आणि अविभाज्य अंग म्हणजे स्मरण. ह्यालाच जप असेही म्हणतात.
सुरवातीला जन्म-मृत्त्युचे बंधन आणि त्यातून मुक्ती हे शब्दप्रयोग आणि ह्या कल्पना आपल्याला अनैसर्गिक (आणि काहीजणांना तर विकृत) वाटू शकतात. परंतु आपण जसे जसे; जीवनाच्या गाभ्याच्या नजीक पोचतो, तसे तसे हे शब्द प्रयोग आणि ह्या कल्पना समजू लागतात. त्यांच्यातील मर्म ध्यानात येऊ लागते. जन्म आणि मृत्युच्या अर्थात संसाराच्या बंधनातून मुक्ती म्हणजे आंतरिक सामाधानापासून पुन्हा पुन्हा फरफटत दूर जावे लागण्यापासून मुक्ती असते; ह्याची कल्पना येऊ लागते.
पण हे सारे नामस्मरणाच्या आचरणानेच अधिकाधिक स्पष्ट होऊ लागते!
पण म्हणूनच महाराज युधिष्ठीर आपल्या सर्वांच्या वतीने हा प्रश्न उपस्थित करीत असताना दिसत आहेत, की कोणत्या जपाच्या साह्याने जंतू म्हणजे मनुष्य प्राणी जन्म आणि मृत्यू ह्यांच्या; अर्थात संसाराच्या बंधनातून मुक्त होईल?

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 4589 )  |  User Rating
Rate It

लेखांक १०. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातì
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक १०.
प्रश्न ४.
(अशुभ म्हणजेच सच्चिदानंदाच्या आड येणारे सर्व नष्ट होण्यासाठी) कंमर्चंत: म्हणजे अर्चना करण्यायोग्य वा पूजा अर्चा करण्यायोग्य कोण आहे? अर्चना किंवा पूजा अर्चा कुणाची करावी?
आईला आपल्या नवजात बाळाला किती जपू आणि कसे जपू असे होते. त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असे होते. त्याच्यावरून सर्वस्व, अगदी जीव देखील ओवाळून टाकावा असे होते. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असे होते. त्याचे कोड कौतुक किती आणि कसे करू आणि कसे नको असे होते. त्याचे सर्व काही करण्यामध्ये काही उणे पडू नये आणि काही चुकू नये असे तिला वाटते!
महाराज युधिष्ठीर यांची (प्रत्यक्षात आपली सर्वांची जरी आपल्याला काळात नसली तरी) वास्तवात अवस्था, आईसारखीच आहे.
ज्याची आंतरिक ओढ लागते, जे अत्यंत महत्वाचे वाटते, जे सर्वाधिक महत्वाचे वाटते त्याची पूजा अर्चा करण्यात काही गफलत होऊ नये असे वाटते.
ज्याप्रमाणे बाळाचे सर्व काही यथायोग्य व्हावे; आणि ते बाळालाच पोचावे यासाठी आई; अनुभवी मातांकडून मार्गदर्शन मागते, त्याचप्रमाणे अर्चना म्हणजेच पूजा-अर्चा योग्य व्हावी आणि योग्य तिथे पोचावी ह्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे.

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 3832 )  |  User Rating
Rate It

लेखांक ९. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीë
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ९.
प्रश्न ३.
(अशुभ म्हणजेच सच्चिदानंदाच्या आड येणारे सर्व नष्ट होण्यासाठी) स्तुवन्त: कं म्हणजे स्तुती करण्यायोग्य कोण आहे किंवा कुणाची स्तुती करावी? ह्या अगोदर वर्णन केलेली सद्गती म्हणजेच सर्वांच्या अंतरंगातील हे स्थान; निराकार, अदृश्य म्हणजेच निर्गुण असल्यामुळे त्याविषयी कल्पना करता येत नाही. एका बाजूने सर्वांना उत्कट आणि अनामिक ओढ तर लागते, पण दुसऱ्या बाजूने त्याविषयी गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता असते. विपरीत कल्पना निर्माण होण्याची शक्यता देखील असते.
अशी विपरीत कल्पना होऊ नये, म्हणून आत्मज्ञानी आणि आत्मसाक्षात्कारी सदगुरूंकडे धाव घेणे आणि त्यांना प्रश्न विचारणे वा सांकडे घालणे गरजेचे आणि योग्य असते. आपल्याला योग्य ज्ञान मिळावे, आपली इच्छा योग्य दिशेला वळावी आणि आपल्याकडून योग्य क्रिया घडावी ह्यासाठी सद्गुरुंचे अंतरंग आणि आपले अंतरंग जोडले जाणे आवश्यक असते. ह्यालाच सद्गुरुकृपा म्हणतात. अशा सद्गुरुकृपेने आपला जिव्हाळा (जो दुधावरील सायीप्रमाने किंवा ताकावरील लोण्याप्रमाणे आपल्या जीवनाचे सर्वस्व असतो, तो अनुचित प्रकारे अनुचित ठिकाणी न जाता) योग्य शब्दातून आणि योग्य ठिकाणी पोचावा म्हणून आर्ततेने विचारलेला हा प्रश्न आहे.
आत्मज्ञानी जगद्गुरू महर्षी वेदव्यास यांनी विश्वकल्याणासाठी आपणच हा प्रश्न महाराज युधिष्ठीर यांच्याद्वारे भीष्म पितामह यांना विचारून आपणच भीष्मचार्यांच्याद्वारे त्याचे समर्पक उत्तर पुढे दिले आहे.

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 3699 )  |  User Rating
Rate ItNone
To
Scrap Flag
Scrap