World's first medical networking and resource portal

Dr. Shriniwas Kashalikar's Profile
Special Message:
Over 170 videos, 45 books and 500 articles in Englsh, Hindi and Marathi are available for free download on www.youtube.com/superliving08 and
www.freestress.webs.com
www.slideshare.net/drsuperliving
VOTES0000070
PAGE HITS0061269

लेखांक ८ .श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीë
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ८.
प्रश्न २. किंवाप्येकं परायणम् ह्याचा आशय असा आहे की विश्वनियंत्रक अशी शक्ती ही कुणी व्यक्ती नाही. ती वस्तू नाही. ती एकादे स्थान नाही. ती वीज किंवा उष्णता यासारखी उर्जा नाही. ती अवकाश व काल देखील नाही. ती वासना, भावना, कल्पना, विचार, प्रेरणा, इच्छा इत्यादी काही नाही. ती एकादी निव्वळ मानसिक अवस्था देखील नाही. परंतु, ती शब्दातीत शक्ती आपल्या अंतर्यामी आणि खोलवर असल्याचे जसे अस्पष्टपणे जाणवते, तसेच ती संपूर्ण विश्वातील अणुरेणु व्यापून आहे असे देखील भासते. अंतर्यामी असल्यामुळे शरीराने तिथे पोचण्याचा प्रश्नच नाही. परंतु जाणीवेने तिथे पोचण्यासाठी देखील ती अत्यंत दूर भासते.
वर्णन करण्यास अशक्य असल्यामुळे ह्या सद्गतीचे वर्णन आपापल्या परीने संकेताने केले जाते. आपण तिला जाणीवेची सद्गती म्हणू. ह्या सद्गतीलाच; परंधाम, ईश्वराचे चरण कमल, ईश्वरी साक्षात्कार, सद्गुरुभेट, मोक्ष, निर्वाण, मुक्ती म्हणतात. जाणीवेच्या ह्या सद्गतीमध्ये पूर्णत्व येत असल्या तिला शाश्वत समाधानाची किंवा सच्चिदानंदाची अनुभूती म्हणतात. ती जाणीवेच्या पलीकडे असलेली सर्वांच्या अस्तित्वाची आणि जाणीवेची सद्गती असल्यामुळे आणि ह्या सद्गतीमध्ये सुरक्षितता अनुभवाला येत असल्यामुळे तिला कालातीत आश्रयस्थान म्हणतात. तिचे स्वरूप धूसरपणे जाणवत असल्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो, की सर्वांचे अंतीम गंतव्य असे ते जडत्वहीन आणि म्हणूनच पवित्रतम असलेले असे स्थान कोणते?

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 3400 )  |  User Rating
Rate It

लेखांक ७. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्राती
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ७.
नम: समस्त भूतानाम् आदिभूताय भूभृते
अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभविष्णवे -२.
सर्वासामान्यपणे पाच महाभूतांमध्ये वर्गीकृत अशा चराचर मूळ पदार्थांचेही मूळ असलेल्या आणि अनेक रूपातील अशा जगत्स्वामी विष्णूला माझे पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार असोत.
वैशंपायन उवाच
श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानि च सर्वश:
युधिष्ठिर: शांतनवं पुनरेवाभ्यभाषत -३.
वैशंपायन ऋषी जनमेजय राजाला म्हणतात, भीष्माचार्याकडून, संपूर्ण पवित्र धर्म आणि धर्माचार यांच्यासंबंधीचे विवेचन ऐकून धर्मराज युधिष्ठिर भीष्माचार्याना सहा प्रश्न विचारतात.
किमेकं दैवतं लोके किंवाप्येकं परायणम्
स्तुवन्त: कं कंमर्चन्त: प्राप्नुयुर्वानवा: शुभम् ४.
को धर्म: सर्व धर्माणां भवता: परमो मत:
किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबंधनात् -५.
प्रश्न १. किमेकं दैवतं लोके म्हणजे ह्या विश्वामध्ये एकमेवाद्वितीय असा देव कोणता आहे? देव ह्याचा आशय स्वतंत्र आणि विश्वनियंत्रक अशी शक्ती. आपण सर्व व्यक्तीश: मर्यादित आणि परतंत्र असलो तरी अशा शक्तीची सुप्त आणि अनामिक ओढ असल्यामुळे आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होतो.

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 3468 )  |  User Rating
Rate It

लेखांक ६. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीë
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ६
श्री गणेशाय नम:
संपूर्ण विश्वाचा आणि आपल्या जीवनाचा आणि प्रज्ञेचा देखील मूलाधार अशा ॐकाराचे सगुण स्वरूप म्हणजे गणेश. म्हणूनच सर्व कार्याप्रमाणे ह्या कार्याच्या आरंभी देखील श्री गणेशाला नमन असो.
श्री. वेदव्यासाय नम:
भगवान श्री वेदव्यास महर्षीनी महाभारतामध्ये भीष्माचार्य आणि युधिष्ठिर ह्यांच्या संवादाद्वारे विष्णूसहस्रनामस्तोत्र प्रगट केले आहे. ह्या स्तोत्राचा आशय म्हणजे सर्व तऱ्हेच्या भेदाभेदांच्या पलीकडील कालातीत सामर्थ्याचा महास्त्रोत आहे. वैयक्तिक आणि वैश्विक उत्कर्षाची ती महासंजीवनीच आहे.
वेदव्यास म्हणजे आपल्याच अंतरंगातील, पण एरवी आपल्याला सहजासहजी प्राप्त न होणारा असं दुष्प्राप्य आणि दुर्लभ असा सच्चिदानंदच.
म्हणून विष्णुसहस्रनामाचा अचूक आशय कळावा म्हणून श्री वेदव्यासाना प्रणाम असो.
यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात्
विमुच्यते नमस्तमै विष्णवे प्रभविष्णवे
ज्याच्या केवळ आठवणीने देखील जन्म आणि मृत्युच्या चक्रातून म्हणजे अज्ञ आणि परावलंबी अस्तित्वातून मुक्ती मिळते, तो विष्णू अंतर्बाह्य सर्व व्यापणारा सर्वव्यापी आहे. तो विचारातीत आहे. तो संप्रदायातीत आहे. त्या विश्वव्यापी श्री विष्णूला माझे (माझ्या मर्यादित अस्तित्वाचे) साष्टांग नमस्कार असोत.

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 3403 )  |  User Rating
Rate It

लेखांक ५. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीë
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

लेखांक ५. हे पुस्तक वाचताना तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये (जी अगदी कुशाग्र असली तरीही मर्यादित असते) जखडून न राहता, सत्याच्या प्रचीतीची कास धरणे श्रेयस्कर ठरेल. कारण, खरा नास्तिक तो, जो स्वत:च्या संकुचित बुदधी, कल्पना, भावना, वासना यांचे सापेक्षत्व जाणून, त्यांना संपूर्ण सत्य मानीत नाही आणि त्यांना चिकटून राहत नाही आणि खरा आस्तिक तो, जो हे करतानाच केवळ चिरंतन सत्य अशा आत्मस्वरुपाला (नामाला) चिकटून राहतो तो! त्यामुळे असे सूज्ञच खरे आस्तिक आणि खरे नास्तिक असतात.
दुसरी बाब अशी की हे पुस्तक एकट्या लेखकाचे नाही. ज्याप्रमाणे स्वत:चे मातापिता, आनुवंशिकता, जन्मस्थान, कुटुंब, हे जसे व्यक्तीला ठरवता येत नाही, त्याचप्रमाणे तिचे स्वत:चे विचार, भावना, प्रतिभा; हे सारे देखील व्यक्तीला ठरवता येत नाही. ते सारे तिच्या कल्पनेपलिकडील सर्वान्तर्यामीच्या सच्चिदानंदातून स्फुरते आणि म्हणूनच ह्या ईश्वरी कृपेमध्ये सर्वांनी हक्काने सहभागी व्हायचे असते. एकाद्या कपातून गंगा प्राशनाचा योग आला तर ज्याप्रमाणे कप हा गंगेचा जनक नसतो, त्याचप्रमाणे हे आहे.
तिसरी बाब अशी की, लेखकामध्ये मर्यादा असू शकतात. दोष असू असू शकतात. पण कप फुटका असला तरी ज्याप्रमाणे आपण गंगेला दूषण देत नाही तसेच हे पुस्तक अभ्यासताना नकळत पूर्वग्रहदुषित न होता तुम्ही पुस्तकातील आशयाला दूषण देणार नाही अशी खात्री आहे.

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 2602 )  |  User Rating
Rate It

लेखांक ४. श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातीë
श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील वैश्विक चैतन्य: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
लेखांक ४. सर्वंकष वैयक्तिक आणि वैश्विक कल्याणाचा हा आविष्कार प्रत्यक्षात कसा येईल हे आता जाणून घेऊ.
मेंदूचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे; अचेतन झालेले शरीर ज्याप्रमाणे रक्तपुरवठा नीट होताच पूर्ववत सचेतन आणि कार्यरत होते तसेच हे होणार आहे. सत्याची अनुभूती ही गंगोत्री आहे. तिच्यापासून सदसद्विविवेक, सद्बुद्धी, सत्प्रेरणा, सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प, सदिच्छा, सत्कार्य आणि सुसंवाद यांच्या नवसंजीवनीचा प्रवाह सुरु होतो. ह्या नवचैतन्यदायी प्रवाहाने वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात सद्गुणांचे बल वाढते आणि त्यांचे आधिपत्य आणि सत्ता यांचा अंमल सुरु होतो. यातून जीवनाच्या सर्व क्षेत्रात सदभिरुची, सहिष्णुता, समंजसपणा, सहकार्य, समाधान, स्वास्थ्य यांचे प्रकटीकरण होऊ लागते. यातून लोककल्याणकारी धोरणे, योजना, कायदे, नियम आणि संकेत जरुरीप्रमाणे पुनर्रचित व कार्यरत होतात. अशा तऱ्हेने विष्णुसहस्रनाम (नामस्मरण) ही आत्मज्ञानाची आणि पर्यायाने समृदधीची गंगोत्री आहे. यामध्ये वैश्विक उर्ध्वगामी क्रांतीचे बीजामृत आहे. स्वात्म्यवादी क्रांतीचा उर्जास्त्रोत आहे. यामध्ये आत्मज्ञानी महापुरुषांचे प्रेरणास्त्रोत आणि स्फुर्तीस्त्रोत आहेत. त्याचप्रमाणे पसायदानाची पूर्ती आहे.

Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views ( 2295 )  |  User Rating
Rate ItNone
To
Scrap Flag
Scrap