World's first medical networking and resource portal

Articles
Category : All
Medical Articles
Oct09
डिप्रेशन आणि संपूर्ण तनावमुक्‍ती
डिप्रेशन आणि संपूर्ण तनावमुक्‍ती
डिप्रेशन म्हणजेच अति खिन्नता. मानस शास्त्रज्न, मानसोपचार तज्न, समूपदेशक वगैरे; याबद्दल अभ्यास वा संशोधन करतात. पण सध्या; डिप्रेशन त्यांच्याही हाता बाहेर गेलेले आहे. नुकतीच एका समूपदेशिकेने आत्महत्या केल्याचे कळले.

मेंदूतील, शरीरातील आणि बाहेरील अनेक घटना; डिप्रेशनला कारणीभूत असल्या तरी; मूलत: आपली सदसद्विवेक्बुद्धी विसरणे किंवा दुर्लक्षित करणे हेच डिप्रेशनचे; खरे व महत्वाचे कारण आहे. या आत्मविस्म्रुती मुळे; आपण आपल्या सदसद्विवेक्बुद्धीला न्याय देत नाही; आणि (कितीही "यश" मान, सन्मान, पैसा, किर्ती, लोकप्रियता मिळाली); तरी अंतरयामी पोकळ, पोखरलेले आणि दुबळे राहतो.

अजरामर झालेल्या महापुरुशानी हे जाणून; आपले अन्तर्याम ओळखण्यासाठी; आणि अंतरयामीचे सामर्थ्य मिळवून स्रुजनशीलता प्रगट करण्यासाठी; नामस्मरणाचा (जप, जाप, सुमीरण, सिमाराण, जिक्र; म्हणजेच आत्म स्मरणाचा) मार्ग दाखविला.

जगण्यासाठी प्राण वायू जसा अत्यावश्यक आहे; तसे मनुष्य जीवन कृतार्थ करण्यासाठी नामस्मरणाद्वारे अंतरयामीचे नवचैतन्य मिळवणे आणि आपल्या सदसद्विवेक्बुद्धीला न्याय देणे अत्यावश्यक आहे.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (1708)  |  User Rating
Rate It


Browse Archive