World's first medical networking and resource portal

Articles
Category : All ; Cycle : April 2016
Medical Articles
Apr23
आपले ध्येय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
आपले ध्येय: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

आपण कसे असावे आणि कसे वागावे ह्याबद्दल अनेक मते आहेत. आपल्यालाही अनेकदा अनेक विचार आणि उर्मि येतात. पण आपण कसेही झालो आणि कसेही वागलो तरी आपले समाधान होत नाही. कसेही होण्याचा किंवा कसेही वागण्याचा प्रयत्न केला तरीही समाधान होत नाही.

आपल्या सद्गुरुना म्हणजेच आपल्या अंतरात्म्याला जे आवडते, तसे होणे आणि तसे वागणे; किंवा तसे होण्याचा वा वागण्याचा प्रयत्न करणे; हेच आपल्याला समाधान देते आणि तेच श्रेयस्कर आहे!

पण ते कसे साध्य होईल?

इतर कोणत्याही बाह्य किंवा आंतरिक गोंधळात न अडकता नामस्मरण सुरु करणे, करीत राहणे, ते वाढवण्याचा प्रयत्न करणे; आणि आपल्या कळलेली/अनुभवाला आलेली नामस्मरणाची महती इतराना सांगणे; हेच आवश्यक आहे. त्यानेच आपल्या सद्गुरुना म्हणजेच आपल्या अनंतरात्म्याला समाधान देणारे बदल आपल्यात आपोआप घडत जातात; आणि आपले समाधान व्हायला सुरुवात होते!

श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5452)  |  User Rating
Rate It


Apr19
नौका नामस्मरणाची: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नौका नामस्मरणाची: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

सर्व महान संतांनी आणि आपल्या सद्गुरुनी कोणतीही पूर्व अट न ठेवता नामस्मरणाची नौका आपल्यासाठी खुली केली आहे!

त्यामुळे, आपण कितीही पतित असलो; आणि इतरांनी कळत नकळत; आपला कितीही पाणउतारा केला, अटी घातल्या, अडचणी दाखविल्या, ज्ञान व कर्मकांडाचा बाऊ केला किंवा वेड्यात जरी काढले; तरी आपण विचलित होता कामा नये. खचता कामा नये. नाउमेद होता कामा नये.

आपण कसेही असलो, कितीही पतित असलो तरी सद्गुरुकृपेने नामस्मरणाच्या नौकेतूनच पैलतीराला नक्की पोचू!
श्रीराम समर्थ!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5602)  |  User Rating
Rate It


Apr19
नामाचा महिमा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामाचा महिमा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्रीराम समर्थ!
स्वत:ला सुधारणे म्हणजे नेमके काय? ते कसे शक्य होईल? सुधारणे म्हणजे दोष काढणे म्हणावे तर आपल्यातले हजारो दोष आपल्याला दिसत देखील नाहीत आणि दिसले तर त्यांचे मूळ उपटून काढू म्हणता काढता येत नाही!

सद्गुरू कृपेने; झालेल्या अभ्यासातून आणि आलेल्या अनुभवातून हळु हळु माझी पक्की खात्री होत चालली आहे की; स्वत:ला सुधारणे आणि जगाला सुधारणे ह्या दोन्ही बाबी भिन्न भासल्या तरी वास्तविक भिन्न नाहीत आणि त्या नामस्मरणात अंतर्भूत आहेत.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5479)  |  User Rating
Rate It


Apr18
गुरुमाऊली: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुमाऊली: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

ज्याप्रमाणे मुलाला कशाची गरज आहे हे आईला बरोबर कळते आणि ती मुलाला दूध देते; त्याप्रमाणे आम्हाला आमच्याच हृदयातील चैतन्याची तहान लागली आहे हे आमच्यातल्या चैतन्याची जननी ओळखते. पण विचित्र बाब अशी की आम्हाला आमची तहान कळत नाही आणि समोर आलेल्या चैतन्याचे महत्व आम्हाला कळत नाही! किंबहुना ते चैतन्य ओळखण्याची बुद्धी आणि ते पिण्याची क्षमताच आमच्यामध्ये नसते! त्यामुळे समोर आलेले चैतन्य आम्ही लाथाडतो! पण आमचा हटवादीपणा, आक्रस्ताळेपणा, नतदृष्टपणा पदरात घेऊन, कधी गोंजारून तर कधी वेळ पडल्यास धाकदपटशाने वा आम्हाला शिक्षा देऊन चैतन्याची माउली आमची तहान भागवते!

मातृत्व हे वैश्विक असले तरी प्रत्येकाच्या स्थूल देहाची आई वेगवेगळी असते हे जसे खरे तसेच आपल्याला चैतन्याचे पान घडवणारी आपल्यातल्या चैतन्याची आई देखील मूलत: एकच असली तरी, व्यावहारिक दृष्ट्या वेगवेगळी असते. हिलाच आपण “आपली गुरुमाउली” म्हणून ओळखू लागतो ! श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हीच माझी गुरुमाउली. त्यांच्याच चरित्र आणि वाङमयाद्वारे; जीवन म्हणजे अजरामर वैश्विक चैतन्याचा अंश आहे आणि हे चैतन्य म्हणजेच नाम असून या चैतन्याचा अनुभव घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे नामस्मरण आहे हे समजू लागले.

विशेष म्हणजे नामस्मरण हा सर्वंकष वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाचा राजमार्ग आहे; आणि नामस्मरणाशिवाय शाश्वत समाधान, सार्थकता आणि पूर्णत्व साध्य होऊ शकत नाहीत याची खात्री झाली.

बाळाचे भूकेलेपण, त्याचे रडणे आणि आईचे त्याला दूध पाजणे हे तीनही एकत्र आले की उभयतांची तृप्ती होते! श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ह्या माउलीने रामनामाचे अमृतपान करवून अशी तृप्ती साध्य केली. गुरुमाऊलीच्या ह्या चैतन्यपानाने ऊर कृतज्ञतेने भरून जातोा!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5437)  |  User Rating
Rate It


Apr18
गुरुकृपा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
गुरुकृपा: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

श्रीराम समर्थ!!!
सद्गुरू श्री. गोंदवलेकर महाराजांचे मला कळलेले महान वैशिष्ट्य असे; की त्यांनी माझ्यासारख्या पतितातल्या पतितालाही कोणतीही पूर्व अट न घालता अत्यंत आत्मीयतेने स्वीकारले आणि तात्काळ नामाची संजीवनी दिली.

म्हणून; नामस्मरण सुरु होणे हा आपला परम भाग्योदय, नामस्मरण सुरु राहणे हे परम भाग्य आणि नामस्मरण वाढत जाणे ही आपल्या भाग्याची अभिवृद्धी आणि ही सर्व सद्गुरूंची अक्षय्य कृपा आणि त्यांच्या भेटीची हमीच होय; असे मी समजतो!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5238)  |  User Rating
Rate It


Apr15
राम कर्ता: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
राम कर्ता: डॉ. श्रीनिवास कशाळीकर

या विश्वामध्ये आपण सर्वजण (मानव, प्राणी, वनस्पती, इतर सजीव आणि निर्जीव), विशिष्ट ऊर्जा, क्षमता, विविध गुण आणि सृजनशीलता यानी परिपूर्ण असतो. पण आपल्याला याची यथार्थ जाणीव, कल्पना नसते.

एका टप्प्यावर आपल्यामध्ये वासना, भावना, विचार आणि दृष्टिकोन; प्रगट होऊ लागतात. अशा तऱ्हेने आपल्यातला "मी" जागृत होतो; आणि आपण; वस्तू, पैसा, जोडीदार, घर, नोकरी; किंवा सत्ता, समाजकार्य, लोकसेवा वगैरे मध्ये गुंतून जातो. हे सर्व आपल्या अंतर्मनात आणि जागृत मनामध्ये चालू असते. अश्या तऱ्हेने आपल्या हातून बर्याा वाईट गोष्टी घडत जातात आणि त्यातून येणार्या सुख दु:खातून आणि यश-अपयशातून आपले आणि संपूर्ण विश्वाचे स्वरूप घडत आणि बिघडत जाते!

गुरू म्हणजेच राम. तो काळ, अवकाश आणि आपल्या सर्व जाणीवांच्या अतीत आहे. त्याच्याच कृपेने आपल्याला नामाची संजीवनी प्राप्त होते. त्याच्याच कृपेने तोच सर्वाच्या अन्तर्यामी असल्याचे कळू लागते. त्याच्याच कृपेने आपले संकुचित शहाणपण, क्षुद्र गर्व, अनाठायी हट्ट, अवाजवी आग्रह आणि हीन अहंकार गळून पडू लागतात. त्याच्याच कृपेने आपल्या सवांच्या अन्तर्यामी असलेल्या त्याच्या सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती आणि अमृतमयी सान्निध्याची प्रचीती येऊ लागते.

गुरू म्हणजेच राम. त्याच्याच कृपेने बाकी सर्व ध्येये बाजूला पडत जातात आणि त्याचीच काय ती ओढ तीव्र होत जाते. त्याच्याच कृपेने नामस्मरणातील गोडी आणि सातत्य वाढत जाते. त्याच्याच कृपेने अश्या रीतीने जीवन कृतज्ञता आणि सार्थकता यानी भरून जाते.

हेच मला उमजलेले जीवनाचे सर्वोच्च साफल्य!
श्रीराम समर्थ!!!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5351)  |  User Rating
Rate It


Apr14
GURU (OUR TRUE SELF): DR. SHRINIWAS KASHALIKAR
GURU (OUR TRUE SELF): DR. SHRINIWAS KASHALIKAR

When I say “I”, it refers to what is known and/or what is encompassed by my consciousness. It does not refer to true self.

This true self, beyond my consciousness is God or Guru. He is objective, accurate and hence universally benevolent! It is the same as what is traditionally referred to as NAMA.

My guru Shri Gondavalekar Maharaj taught throughout his life; that; the way of realizing or actually being this true self, which is eternal, immortal and full of ecstasy, is by orienting to it by SMARAN (remembering) NAMA (it) i.e. by practicing NAMASMARAN.

NAMASMARAN is an incoming and blissfully unstoppable global spring!

Blessed and privileged are those, who realize this; and begin to participate in welcoming this spring, by practicing NAMASMARAN and globalizing it; through sharing the experience of its grandeur with others!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5549)  |  User Rating
Rate It


Apr13
नामकारण! डॉ. श्रीनिवास कशाळीकर
नामकारण! डॉ. श्रीनिवास कशाळीकर

कधीही आणि कितीही अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण केले, तरी जेव्हा समाधान होत नाही, तेव्हा अस्वस्थता येते!

मग शोध घेता घेता नामाची ओळख, संशय, चिकित्सा, थोडे थोडे नामस्मरण, वासना आणि नाम यांच्यातली रस्सीखेच, वासनेमागून फरफट, बळजबरीचे नामस्मरण, हळु हळु नामाच्या महानतेची समज, नामस्मरणाचा सक्रीय प्रचार व प्रसार, पण मधून मधून निराशा, मग अधिक नामस्मरण; अशा टप्प्या-टप्प्यानी; आपले सद्गुरू दिवसाचे १२-१३ तास नामस्मरण करण्यासाठी म्हणजेच; अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण; ह्या सर्वांना सामावणारे आणि सर्वांना आधारभूत असे नामकारण करण्यासाठी आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवतात!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5367)  |  User Rating
Rate It


Apr10
SHRIRAM SAMARTH! DR. SHRINIWAS KASHALIKAR
SHRIRAM SAMARTH! DR. SHRINIWAS KASHALIKAR

Gradually I began to sink and lose consciousness. Being separated from my body meant indescribably horrifying event! I was utterly miserable and helpless at that brush with death!

But from the depth of the frighteningly dark unconsciousness that embodied death; suddenly echoed the NAMA, SHRIRAM; and involved me in itself and prompted me that I needed sugar! I could somehow manage to get it from my bedside! But then I had to literally grind and swallow it with water; as my mouth was totally dry! I was revived!

I think; NAMA i.e. my guru, did not want me to part from this body but wanted me to realize the value of NAMASMARAN, practice and promote it and be increasingly involved in it!

Was this my victory? No! This is the victory of NAMA! This is NAMAVIJAY!


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5580)  |  User Rating
Rate It


Apr08
अनुभव: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
अनुभव: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा अनुभव असा की; आपल्या कुवतीनुसार प्रथम अस्वस्थता, मग अभ्यास, मग शोध, मग नामाची ओळख, मग संशय, मग द्वंद्व, मग चिकित्सा, मग थोडे थोडे नामस्मरण, मग वासना आणि नाम यांच्यातली रस्सीखेच, वासनेमागून फरफट, बळजबरीचे नामस्मरण, हळु हळु नामाच्या महानतेची समज, मग नामस्मरणाचा सक्रीय प्रचार व प्रसार, मग उत्तेजना, मग वाढते नामस्मरण, मग अधिक उत्तेजना, मग अधिक अभ्यास आणि नामाचा अधिक उत्साहाने प्रसार, पण मधून मधून निराशा आणि उद्वेग, याशिवाय पुन्हा पुन्हा संशय, कधी कधी खिन्नता, मग अधिक नामस्मरण; अशा टप्प्या-टप्प्यानी; आपले सद्गुरू दिवसाचे १२-१३ तास नामस्मरण करण्यासाठी आपल्याला सक्षम आणि समर्थ बनवतात.


Category (Psychology, Stress & Mental Health)  |   Views (5079)  |  User Rating
Rate It


Browse Archive